जळगाव। देशाची प्रगती खुंटली आहे. व्यक्तिव्यक्तींमध्ये भेद-भाव वाढले असून बंधुत्व नष्ट झाले आहे. दिवसेंदिवस अराजकता वाढली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. हे सर्व नष्ट करण्यासाठी व मानव कल्याणासाठी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव शहरातील निवृत्ती नगर परिसरातील संत आशाराम बापू आश्रमात रविवारी 21 रोजी सामुहिक 108 कुडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
20 रोजी कीर्तन व कलश यात्रा
सकाळी 7 वाजता महायज्ञास प्रारंभ होणार आहे. अशी माहिती रामभाई आशिष यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अनिल चौधरी, गणेश चौधरी, प्रदीप वायकाळे, जयश्री शिवरामे उपस्थित होते. महायज्ञानंतर त्याच दिवशी दुपारी संत समेलन होणार आहे. दरम्यान शनिवारी 20 रोजी शहरातुन संकीर्तन व कलश यात्रा निघणार आहे.
यांची राहणार उपस्थिती
महायज्ञास महसुल तथा पालकमंत्री चंद्रकात पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, माजीमंत्री सुरेश जैन, माजीमंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषद सीईओ कौस्तुभ दिवेगावकर आदी उपस्थित राहणार आहे.