मानव विकास मिशन अंर्तगत मुलींसाठी नाहीत पुरेशा बसेस !

0

शिंदखेडा। शिं दखेडा आगारातून मानव विकास मिशन अंर्तगत मूलींसाठी पूरेशा बसेस नसल्याने वर्षी, चिलाने,खलाणे,चौगाव यांसह सव्वीस गावांतील पाचशेच्यावर विद्यार्थीनी या योजनेपासून वंचित राहतील अशी परीस्थिती आहे.मानव विकासच्या वाढीव बसेस मिळाव्यात व गाड्यांचे मार्ग नव्याने निश्चित करण्यात यावे आणि या रस्त्याला मानव विकासची बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थीनीं व पालकांनी केली आहे. मा.जिल्हाधिकारी, विभागिय नियंत्रक प्रमुख,आगार प्रमुख, यांनी ही समस्या मार्गी लावावी तसेच विद्यार्थी संघटना व प्रवासी संघटनेने लक्ष घालावे अशीही मागणी करण्यात आली आहे.सर्व शिक्षा अभियानांर्तगत मुलींना मोफत शिक्षण आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थीनीना शिक्षणासाठी मानव विकास योजनेत मोफत एस्.टी.पास दिला जातो.

मानव विकास मिशनकरीता चार मार्ग निश्चित : शिंदखेडा आगारातून मानव विकास मिशन करीता चार मार्ग निश्चित केले आहेत.1)शिंदखेडा-कुमरेज-परसामळ-भडणे-हातनूर-साळवे-चिमठाणे 2)शिंदखेडा चिमठाणे-अमराळे-तामथरे-सवाईमुकटी-सोंडले 3)शिंदखेडा-चिमठाणे-आरावे-जखाणे-शेवाडे-वाडी 4) शिदखेडा- होळ-नरडाणा-वारूड- पाष्टे- म्हळसर- मुडावद.मात्र खलाणे,चिलाणे,चौगांव,सव्वीस गावे वगळण्यात आली आहेत.वगळण्यात आलेली गावे:-वर्षी,वरपाडा,अमळथे,सोनेवाडी,चिरणेकदाणे,अलाणे,बाभुळदे,विरदेल,धांदरणे,निरगूडी, सुलवाडे,विटाई, तावखेडा,चौगाव,वरूळ,माळीच,खलाणे,वरसूस,रंजाणे,नेवाडे,दरखेडा,अक्कडसे,जसाणे,निशाणे,गोराणे. शिदखेडा शहरात एम.एच.एस.एस. कनिष्ठ महाविद्यालय,एस.एस.व्हि.पी.एस.महाविद्यालय,स्वामी समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, जनता महाविद्यालय एन.डी.मराठे महाविद्यालय आहेत.

पाचशेच्या वर विद्यार्थीनी मोफत पास पासून वंचित
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणा-या अकरावी व बारावीच्या जवळपास आठशे ते नऊशे विद्यार्थीनी असतील.प्रति बस 120 याप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या 480 विद्यार्थीनींना हे मोफत पास मिळतील.बस क्षमता व निश्चित करण्यात आलेले मार्ग पाहता जवळपास पाचशेच्या वर विद्यार्थीनी मोफत पास पासून वंचित राहतील अशी शक्यता आहे.याचा फटका गरीब विद्यार्थीनी व पालकांना बसणार आहे. मा.जिल्हाधिकारी साहेबांनी ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी विद्यार्थीनी व पालकांनी केली आहे. शिंदखेडा आगारात मोफत पाससेवा देण्यात येणा-या अडचणींमध्ये प्रवासी संघटना व विद्यार्थी संघटनेने लक्ष घालावे त्वरीत समस्या सोडवावी अशी मागणी विद्यार्थीनी व पालकांनी केली आहे. विभागीय नियंत्रकांकडून मंजूर करण्यात आलेल्या मार्गामुळे अनेक विद्यार्थीनी या योजने पासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.