मानसिक आजार निर्मूलनासाठी चळवळ उभारण्याची गरज- डॉ.प्रदीप जोशी

0

राष्ट्रसेवा दलाच्या मानसिक आरोग्य केंद्रात पंधर वाडा सुरू

चाळीसगाव-मानसिक आजार बरा होण्यासाठी परिवारातील सदस्यांनी रुग्णाला सहकाऱ्याची व उपचारासाठी प्रयत्न केले पाहिजे. मात्र असे न होता त्याला वेडा म्हणून वाळीत टाकले जाते व समाजात सापत्न वागणूक दिली जाते यातून उपचारासाठी मानसिक आजार असलेला व्यक्ती आत्महत्येकडे वळतो. मात्र मानस मित्रांच्या सहकाऱ्याने आपण या आत्महत्याकडे वळणाऱ्या तरुण पिढीला आपण वाचू शकतो यासाठी मानसिक आजार निर्मूलन चळवळ राबविली जावी असे मत जिल्ह्याचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.प्रदीप जोशी यांनी येथे व्यक्त केले.

“मन व मनाचा आजार” या विषयांवर व्याख्यान देताना ते बोलत होते. मानसिक आजार चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन त्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर युगंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता बच्छाव, डॉ.सुनिताताई हिरे, आनन शिंपी, मनोहर कांडेकर, अर्जुन परदेशी, प्रा.रवी चव्हाण, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण भोसले, प्रा.डॉ. जे.डी. देशमुख, मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष खुशाल पाटील, पंचायत समितीचे ग्रामीण विस्तार अधिकारी दिगंबर शिर्के, राष्ट्रसेवा दलाच्या मानसिक आरोग्य केंद्र आधारस्तंभ दर्शना पवार यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मानसोपचार घेणाऱ्या युवकाची जीवनावरील अभिवाचन कथा अजिंक्य देशमुख, स्वेता जगताप, स्वेता नगरकर, गायत्री शिरुडे, दर्शन कोठावदे या युवकांनी सादर केली.

मानसिक आरोग्य केंद्राच्या सेवेने भारावले – स्मिता बच्छाव
या केंद्रात गेल्या पाच सहा वर्षांपासून सुप्रसिद्ध मानोसपचारतज्ञ डाँ प्रदिप जोशी महीन्यातुन पहील्या रविवारी केद्रांला भेट देतात, गेल्या सहा वर्षांपासून डाँ प्रदीप जोशी न चुकता येतात व मोफत वैद्यकीय उपचार करीत आहेत या उपक्रमाने मी भारावले असून संस्थेला गरज भासेल तेव्हा मदत करण्याची तयारी असल्याची मनीषा त्यांनी व्यक्त केली.

विविध शाळांमध्ये पोस्टर प्रदर्शन भरविणार
यावेळी मन आणी मनाचा आजार या विषयावरील प्रबोधनात्मक चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. नवजीवन सुपर शॉप यांच्या सहकार्याने विविध पोस्टर लावण्यात आली होती आहे. यावेळी नागरिक व मानसिक आजार असलेली अनेक रुग्ण उपस्थित होते. सकाळी 10 वाजता सुरू झालेले चित्र प्रदर्शन सायंकाळी सहा पर्यंत सुरू होते. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे व डाँ.नरेंद्र दाभोलकर मानसिक आधार व उपचार केंद्र स्वयंसेवक उपस्थित होते दिपक लांब्होळे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.