मानस ज्वेलर्समधून अडीच लाखाचे दागिने लांबविले

0
रावेर शहरातील घटना
रावेर : अज्ञात बुरखा धारी महिलांनी शहरातील मानस ज्वेलर्स येथून अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी घडली होती. या बाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार, 8 रोजी रावेर शहरातील मानस ज्वेलर्स येथे चार बुरखाधारी महिला सोन्याचे दागिने पाहण्यासाठी आल्या व दागिने पाहत असल्याचे  बहाणा करून दुकानातील प्लास्टीकच्या डब्यामधील सोन्याच्या कानात घालण्याच्या टॉप्स व टोंगल असा सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे दहा तोळे वजनाचे सोन्याचे  दागिने या महिलांनी लांबविले होते. या बाबत दुकान मालक राजेश अग्रवाल यांच्या फिर्यादी वरुन भादवि ३८०/३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील व सहकारी करीत आहे.