माफी मागावी अन्यथा राज्यपालांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही !
चाळीसगावात राज्यपालांच्या विधानावरून शिवप्रेमी संघटना आक्रमक
चाळीसगाव : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल चाळीसगावात शिवप्रेमी संघटना आक्रमक झाली असून राज्यपालांनी राज्याची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा शिवप्रेमी संघटनांनी निवेदनाद्वारे केला आहे.
संतापजनक विधानाचा निषेध
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू होते त्यामुळे रामदासच नसते तर शिवरायांना कोण ओळखले असते ? असे संतापजनक विधान केले. यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या संतापजनक विधानाच्या निषेधार्थ शहरातील तहसील कार्यालयासमोर मंगळवार, 1 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता शिवप्रेमीं संघटनानी निषेध आंदोलन करून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे तहसीलदार यांना निवेदन देवून दिला.
यांची होती उपस्थिती
यावेळी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, वीर भगतसिंग परीषदेचे पंकज रणदिवे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुधीर पाटील, मराठा महासंघाचे खुशाल बिडे, जळगाव जिल्हा दूध संघ संचालक प्रमोद पाटील, सभापती अजय पाटील, माजी नगरसेवक दीपक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भैय्यासाहेब पाटील, शेकापचे गोकुळ पाटील, जयश्री रणदिवे, योगेश पाटील, पंकज पाटील, आकाश पोळ, राकेश राखुंडे, सचिन पवार, प्रदीप चिकणे, प्रदीप पाटील, रवींद्र देशमुख, सोनु देशमुख, विलास मराठे, स्वप्नील गायकवाड, संजय कापसे, दिलीप पवार, भरत नवले, प्रदीप मराठे, प्रशांत अजबे, मुकुंद पवार आदी उपस्थित होते.