मामाजी टॉकीज रस्त्यावर अमृत योजनेच्या कामाचा मंगळवारी शुभारंभ

0
शहरवासीयांना दिलासा ; शहरवासीयांना उपस्थितीचे अवाहन
भुसावळ:- केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी अमृत योजना शहरासाठी मंजूर असून मंगळवारी या योजनेंतर्गत मामाजी टॉकीज रस्त्यावर पाईप लाईन टाकून सोमवारी सकाळी 10 वाजता प्रारंभ होणार आहे. पावसाळ्यापूर्वी या भागात पाईप लाईन टाकून काम पूर्ण करण्याकडे पालिका प्रशासनाचा कल असून त्यानंतर या भागात रस्त्यांची कामे करण्यावर भर दिला जाणार आहे.
मंगळवारी सकाळी 10 वाजता पाईपलाइनच्या कामाला सुरवात केली जाणार आहे. नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, स्थानिक नगरसेवक व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत नारळ वाढवून या कामाला सुरवात केली जाणार असून नागरीकांनी उपस्थिती द्यावी,  असे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे यांनी केले आहे.