मायदेशात महिला क्रिकेट संघाचे जंगी स्वागत

0

मुंबई । आयसीसी महिला विश्‍वचषक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणार्‍या भारतीय महिला क्रिकेट संघाचे बुधवारी मुंबईत विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. खेळाडू बाहेर येताच चाहत्यांनी इंडिया, इंडियाच्या घोषणा दिल्या. विमानतळावर करण्यात आलेल्या स्वागतामुळे कर्णधार मिताली राज भारावून गेली होती. मिताली म्हणाली की, आमच्यापैकी कोणाचेच असे भव्य स्वागत कधी झाले नव्हते.

महिला खेळांमध्ये चांगली प्रगती करत असल्याचा आनंद आहे. काही दिवसांपासून झालेल्या बदलांची नितांत आवश्यकता होती. महिला क्रिकेट संघाबद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती. खेळ आणि कामगिरीमुळे आम्हाला ओळख मिळाली आहे. भारतीय संघातील हरमनप्रीत कौर, झुलन गोस्वामी, सुषमा वर्मा, स्मृती मंधाना, शिखा पांडे, पूनम राऊत आणि दीप्ती शर्मा बुधवारी सकाळी इंग्लंडहून मुंबईत आल्या. इतर खेळाडू दुपारच्या सुमारास मुंबईत परतले.