माय मराठीला कॉप्यांचा सुळसुळाट

0

जळगाव । दहावीच्या परीक्षेला मंगळवारी 7 मार्च रोजी सुरुवात झाली. मात्र कॉपी बहाद्दरांच्या झालेल्या सूळसाटाने पोलीस देखील हैराण झाले आहेत. पोलीसा देखत एकाने विद्यार्थ्यांना कोपया पुरवल्याचा प्रयत्य मराठीच्या महिल्या पेपर ला आला आहे. मात्र परीक्षा संपेपर्यत केंद्रावर मोठी गर्दी होती. मराठी भाषिक असणार्‍या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थ्यान मध्ये नाराजी दिसून आली. जिल्हात एकून 13 विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाची परीक्षा मध्ये डिबार करण्यात आले आहे. देण्यापासून मुकावे लागणार आहे . परीक्षा केंद्रे असणार्‍या महाविद्यालयांना पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा फौज फाटा लावण्यात आला होता. शिक्षण विभागाने देखील परीक्षा केंद्रावर विशेष अशी खबरदारी घेतली होती.

कॉपी बहाद्दराचे धाबे दणाणले
बारावीच्यापरीक्षेनंतर दहावीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याभरात एकून 127 केंद्रांवर 64 हजार 487 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. कॉपी प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात 15 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याने कॉपी बहाद्दराचे धाबे दणाणले आहे. या मुळे कॉपी करणार्‍या विद्यार्थ्यांना एक प्रकारे लगाम मागणार आहे. परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या विद्यार्थ्यांवर डीबारची कारवाई कॉपीप्रकरणी मदत करणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील वादग्रस्त असलेल्या केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, शिक्षण विभागाने दहावी बोर्डाच्या परीक्षेत कोणताही प्रकारचा वाद नको म्हणून विशेष खबरदारी घेतेली आहे.

महाविद्यालयात पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त
दहावीच्या परीक्षा नेहमीच घडलेल्या घटनेमुळे चर्चेत राहतात. या मुळे पोलिसांनी सजग राहून दहावी च्या बोर्डाच्या परीक्षेवेळी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील मध्यावर्ती असणार्‍या नूतन महाविद्यालय, जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय , नंदिनीबाई विद्यालय,ला. ना महाविद्यालय ,आर आर महाविद्यालय, विद्यानिकेतन महाविद्यालय , सागर हायस्कूल,महाराणा प्रताप हायस्कूल, अग्लो उर्दू महाविद्यालय ठिकाणी कॉपी बहाद्दराचा वावर असल्याने या ठिकाणी पोलिसाचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.

अफवा पसरवणार्‍या वर कार्यवाही
जळगाव शहरात काही महाभागा कडून पेपर फुटी ची अफवा पसरवणार्‍याचा प्रयत्न करण्यात आल्याने विद्यानिकेन महाविद्यालयाच्या परिसरात काही काळ गोधळ झाला होता. मात्र उपस्थित नागरिकांनी एका पोलीस कर्मचार्‍या जवळ शहानिशा केल्याने पोलीस कर्मचार्‍या कडून असे काहीच झाले नसल्याची माहिती दिली. अफवेला पूर्ण विराम मिळाला आहे. या संबधी अफवा पसरवणार्‍याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या बाबत अफवेवर कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात
आले आहे.