जळगाव । पाचोरा तालुक्यातील शहापुरा येथे 6 जानेवारी 2017 रोजी एकाला लोखंडी पाईपाने मारहाण झाली होती. पिंपळगाव हरेश्वर पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. यातील मारहाण करणार्या संशयिताने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता त्यावर आज कामकाज होवून न्या. चित्रा हंकारे यांनी अटकपूर्व फेटाळून लावला आहे. शहापुरा येथील रविंद्र परदेशी यांना 6 जानेवारी रोजी किरकोळ कारणावरून विनोद रामधन परदेशी (वय-32 रा.शहापुरा) याने लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली. याबाबत रविंद्र परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 10 जानेवारीला पिंपळगाव हरेश्वर येथे विनोद परदेशी याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी विनोद याने न्या. चित्रा हंकोर यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला. यानंतर आज बुधवारी या अर्जावर कामकाज होवून न्या. हंकारे यांनी विनोद परदेशी याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला .
सचिवाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
जळगाव- बांभोरी शिवारातील फाऊंडेशन ब्रेकर्स अॅम्प्लॉईज क्रेडीट सोसायटीतील अपहार प्रकरणातील संशयित सचिवाने अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालायात दाखल केला होता. त्यावर आज बुधवारी कामकाज होवून न्या. चित्रा हंकारे यांनी सचिव विजयकुमार श्रीनारायण व्यास याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. बांभोरी शिवारातील फाऊंडेशन ब्रेकर्स अॅम्प्लॉईज क्रेडीट सोसायटीत 2 कोटी 81 लाख 73 हजार 138 रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरिषणात आढळून आले होते. यानंतर याप्रकरणी लेखापरिषक दिपक रामनारायण काबरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात संशयित असलेल्या सोसायटीचे सचिव विजयकुमार श्रीनारायण व्यास यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्या. चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज बुधवारी कामकाज होवून न्या. हंकारे यांनी संशयित विजयकुमार व्यास यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.