मारहाणीदरम्यान विहिरीत पडला तरुण : जाडगावच्या इसमाविरोधात गुन्हा

Jadgaon youth dies after falling into well: Crime against one भुसावळ : तालुक्यातील जाडगाव येथील तरुणाच्या विहिरीत बुडून झालेल्या मृत्यू प्रकरणी जाडगावातील तरुणाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाणीदरम्यान तरुण पडला विहिरीत
गुरुवार, 8 रोजी दुपारी अडीच वाजता संशयीत आरोपी राजू युवराज सोनवणे (जाडगाव, ता.भुसावळ) याने छातीत बुक्का मारल्याने तसेच चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याने गोविंदा संतोष पाटील (35, जाडगाव) या तरुणाचा ग्रामपंचायतीच्या विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी संतोष जगदेव पाटील (60, जाडगाव) यांच्या फिर्याडीनुसार आरोपी राजू सोनवणेविरोधात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ करीत आहेत.