जळगाव | पोलिसांना महिती दिल्याने सट्टयाच्या अड्डयावर कारवाई झाल्याचा राग आल्याने सुमित वसंतलाल वलभाणी वय २८ याला परिसरात राहणार्याच १० जणांनी त्याच्या घरावर दगड मारून घरात घुसुन मारहाण केली. तसेच त्याचा मित्र जितेंद्र भागवानी याला देखील मारहाण केली होती. याप्रकरणी सोनु दर्शन थोराणी, दर्शन थोराणी, भारता शामलाल कुकरेजा, नितीन शामलाल कुकरेजा, दिपक सुरेश कुकरेजा, पवन बालाणी, अरुण बालाणी, भारत कुकरेजा, सरजु कुकरेजा शाम कुकरेजा रा. सर्व सिंधी कॉलनी या सर्व संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी दर्शन भिकुमल थोराणी वय ४५ व साजन उर्फ सरजू चंदुमल कुकरेजा वय ५४ रा. दोघे सिंधी कॉलनी यांना अटक केली आहे. याप्रकरणी दोघांना आज न्या. सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर केले असता, दोघांना दि.५ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. सरकारपक्षातर्फे ऍड. बारगजे यांनी कामकाज पाहिले.