जोहान्सबर्ग । कसोटी क्रिकेट असो वा प्रथम श्रेणीचे क्रिकेट त्रिशतक हे कायम चर्चेत राहिलेले आहे. आणि जर तिसरे शतक सर्वात वेगवान असेल तर क्या बात है. वेगवान त्रिशतक करण्यासाठी वीरेंद्र सेहवागचे नाव सर्वात पहिले घेतले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक करणारा वीरेंद्र सेहवाग हा खेळाडू ठरला आहे. सेहवागने 2007 – 08 मध्ये चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 278 चेंडूंमध्ये त्रिशतक केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनचा नंबर येतो. ज्याने 362 चेंडूमध्ये त्रिशतक केले आहे. त्यानंतर पुन्हा तिसर्या नंबरवर विरेंद्र सेहवागने पाकिस्तानच्या विरूद्ध खेळताना 364 चेंडमध्ये त्रिशतक केले. द. आफ्रिकेच्या मार्को मॅरेसने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक करून अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज बनण्याचा मान मिळवला. 24 वर्षीय मरॅसने दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसीय प्रांतीय स्पर्धांंमध्ये बॉर्डरकडून खेळतानाईस्टन प्रोविंसच्याविरुद्ध 191 चेंडूत नाबाद 300 धावा केल्या. या अगोदर सर्वात फवेगवान त्रिशतक हे 1921 मध्ये चार्ली मॅकार्टनीने 221 चेंडूत बनवले. त्याने नॉटिंघमशायरविरुद्ध हे त्रिशतक केले आहे.
या खेळाडूने रचला हा विक्रम
मरॅस जेव्हा खेळण्यासाठी मैदानावर उतरला तेव्हा त्याच्या संघाची अवस्था चार बाद 82 अशी होती. त्यानंतर त्याने सामन्यामध्ये 35 चौकार आणि 13 षटकार ठोकत संघाला संजीवनी दिली. या दरम्यान मॅरेसने ब्रेडले विलियम्ससोबत (113) 428 धावांची भागिदारी केली. पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला. मॅरेसने या सामन्यात पहिल्या दिवशी 68 चेंडूत 100 धावा केल्या.