मार्च एण्ड : रावेर तालुक्यातील पाच हजार थकबाकीदारांना नोटीसा

रावेर : मार्च एण्डच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतीने कर वसुलीवर भर दिला असून रावेर तालुक्यातील 67 ग्राम पंचायतीतील चार हजार 768 लोकांना चार कोटी 69 लाख 95 हजार 880 रुपये थकविल्याप्रकरणी नोटीसा बजावण्यात आल्याने थकबाकीदारांच्या गोटात खळबळ उडाली आहे. येत्या 10 एप्रिल रोजी रावेरला लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून या लोकअदालतमध्ये सहभाग घेऊन जास्तीत-जास्त ग्रामस्थांनी थकीत ग्रामपंचायतच कराचा भरणा करावा, असे आवाहन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी केले आहे.

10 रोजी लोकअदालत
येत्या 10 एप्रिल रोजी आयोजित लोकअदालत संदर्भात मंगळवारी रावेर पंचायत समितीत गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्या उपस्थितीत महत्वाची व्हिडीओ कॉफ्रन्सद्वारे बैठक झाली. यात रावेर तालुक्यातील 67 ग्राम पंचायतीतील चार हजार 768 लोकांना विविध ग्राम पंचायतीचे कर, घरपट्टी व पाणी पट्टी, गाळे करासह अन्य करापोटी तब्बल चार कोटी 69 लाख 95 हजार 880 रुपयांचा कर थकविल्या प्रकरणी नोटीसा बजावण्यात आल्या. 10 एप्रिलच्या लोकअदालतमध्ये सहभाग घेऊन जास्तीत-जास्त नागरीकांनी थकीत ग्रामपंचायत कराचा भरणा करण्याचे अवाहन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी केले आहे.