भुसावळ : टीएस-डब्ल्यूएसयुपी या मालगाडीवरील गार्ड आर.जी.राऊत (बडनेरा) यांच्यावर अज्ञात इसमांनी मलकापूर स्थानक येण्यापूर्वी चाकूहल्ला केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजेपूर्वी घडली. जखमी अवस्थेतील राऊत यांना भुसावळातील रेल्वे रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरपीएफ निरीक्षक बनकर व सहकार्यांनी हल्ला करणार्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.