जळगाव। मैत्रेय उद्योग परिवाराचे सर्व पिडीत ग्राहक आणि प्रतिनिधींना गेल्या 18 महिन्यापासून कंपनीकडून कुठलाही परतावा मिळत नाही. कंपनी किंवा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे अश्वासन मिळाले नाही त्यामुळे मैत्रेयच्या जिल्ह्यातील हजारो ग्राहक व प्रतिनिधी प्रमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला.
मैत्रेयमधील गुंतवणूकदारांच्या रक्कमेसंदर्भात नाशिक न्यायालयाचा निकाल फक्त नाशिकस्थित ग्राहकांनाच रक्कम देण्यासंदर्भात असल्याने तो अमान्य करीत महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील लाखो ग्राहक मैत्रेयकडून त्यांचा हक्काचा पैसा परत मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत प्रशासनसस्तरावर आजपर्यंत काय कार्यवाही झाली. व पुढे शासन काय करणार आहे या धोरणाची माहिती होण्याबाबत आग्रही भूमिका घेण्यात आली. तसेच 5 फेब्रुवारी 2015पासून ग्राहकांचे पेमेंट दिले गेलेले नाहीत. कंपनीचा सर्व डाटा, माहिती, सर्व्हेर हे साहित्य सरकारवाडा पोलिस स्टेशन नाशिक यांच्याकडे जप्त असून त्यातील माहितीनुसारमुदतपूर्ती परतावा त्वरीत करण्यात यावा,असेही निवेदनात म्हटले आहे.
या आहेत लक्षवेधी मागण्या
ग्राहकांना परतावाबाबत प्रशासनाने आराखडा जाहीर करावा, जप्त मालमत्ता विकण्यासंदर्भात निर्णय, मैत्रेय सर्व्हिसेस, प्लॉटर्स अॅन्ड स्ट्रक्चर्स, रिअलटर अॅन्ड कंट्रक्शन, सुवर्णसिध्दी प्रा. लि. आदी कंपन्यांची मालमत्ता प्रशासनाने घोषीत करावी, प्रशासनाने कंपनीच्या अघोषीत मालमत्तेचा शोध घ्यावा, यासह कंपनीचे संचालक यांना समोर येण्यास भाग पाडावे. आणि प्रशासन व कंपनी यांनी मालमत्ता जाहीर रित्या विक्री करुन ग्राहकांचा परतावा त्वरीत द्यावा याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले.