जळगाव – जिल्हाधिकारी याचे करोना ( कोव्हीड 19 ) या संर्सगजन्य आजारापासुन संरक्षण होण्याकरीता जमाब बंदीचे आदेश लागु अाहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पाच विविध ठिकाणच्या मालवाहू वा हन चालकांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
अन्वर शब्बीर कुरेशी वय ३० रा. मासुमवाडी जळगाव, हमीद लालखॉ पठाण वय ४४ रा. मेहरुण, दिपक रामचंद्र ठाकुर वय २८ रा. वराडसिम ता. भुसावळ, राजाराम सोपान अपार वय ४६ रा. खुबचंद साहित्यानगर व गणेश कडुबा घोंगडे वय २४ रा.पहुर हे त्याच्या ताब्यातील वाहन घेवुन कोणतीही खबरदारी न घेता तोंडाला मास्क अगर रुमाल न लावता विनाकारण फिरतांना अजिंठा चौफुली परिसरात मिळुन आले आले . सर्वांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात विरुध्द भादवि कलम 188 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली
पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली स .फौ अतुल वंजारी , स . फौ . आनंदसिंग पाटील , पोहेकॉ रामकृष्ण पाटील , पो . ना . राजेंद्र ठाकुर, पो . ना . कृष्णा पाटील , पो .का . श्रीकांत बदर , पो . का . चेतन सोनवणे, पो . का . सचिन पाटील , पो . का . योगेश बारी यांनी ही कारवाई केली
आहे .