मालेगावातील चोरट्या महिला जाळ्यात

0

रावेरमधील मानस ज्वेलर्समधील चोरीचा अखेर उलगडा

रावेर– शहरातील मानस ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. अटकेतील महिलांविरुद्ध मालेगावसह आंध्रात गुन्हे दाखल असून अन्य काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्हीच्या आधारावरून पोलिसांनी तिघाही महिलांना मालेगावात जावून बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून पाच तोळे सोने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी दिली.

सीसीटीव्हीमुळे गुन्हा उघड
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात टोयोटा कंपनीची कंपनीची चारचाकी (एम.एच. 04 एफ.एफ. 4153) मधून चार बुरखाधारी महिला सराफ बाजाराकडे कडे जाताना फुटेजमध्ये पोलिसांना आढळले होते तर गाडीचा नंबर घेऊन आरटीओमार्फत माहिती काढल्यानंतर तपासाची दिशा मालेगावकडे वळल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

या कुविख्यात महिलांना अटक
सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, कॉन्स्टेबल जाकिर पिंजारी, हरी पाटील, विठ्ठल पाटील, महिला कॉन्स्टेबल रहिसा तडवी यांनी मालेगाव शहरातून साजदा बानो बसीर खान (31), ताहेर कुशीद अहमद (21), फरजानू बानू शेख चाँद (30) या तिघांच्या मुसक्या आवळल्या. अन्य आरोपींच्या तपासासाठी पथक रवाना करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

आठ दिवसात चोरीचा उलगडा
8 जानेवारी रोजी शहरातील मानस ज्वेलर्समध्ये चोरी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता तर महिला चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान रावेर पोलिसांपुढे उभे ठाकले होते. सुरुवातीला शहरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या छोट्याश्या धाग्यावरून पोलिसांनी तपास चक्र फिरवण्यास सुरुवात केली. गुन्हा घडल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर आरोपींनी चारचाकी लावली होती व त्या क्रमांकाच्या आधारे रावेर पोलिसांनी आरोपींचा माग काढत तिघा चोरट्या महिलांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, एका महिलेस वाहन चालक मात्र अद्याप पसार असल्याचे सांगण्यात आले.