मालोदच्या लाचखोर कोतवालासह दोघांची पोलिस कोठडीत रवानगी

भुसावळ : तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावरील बहिणीचे नाव इतर अधिकार नोंदमधून कमी करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या यावल तालुक्यातील मालोदचे कोतवाल जहाँगीर बहादुर तडवी (56, रा.मालोद, ता.यावल, जि.जळगाव) व खाजगी पंटर मनोहर दयाराम महाजन (45, रा.किनगाव ता.यावल) यांना मंगळवारी दुपारी एसीबीच्या पथकाने अटक केली होती. संशयीतांना भुसावळ सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव व सहकारी करीत आहेत.