रावेर : खान्देश माळी महासंघाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व महिलांसाठी सुरु केलेल्या सावित्रीच्या लेकी या जीवन गौरव पुरस्कार उपक्रमाच्या नियोजनासाठी 22 रोजी सावित्रीबाई फुले नगर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी खान्देश माळी महासंघाच्या वतीने येत्या 3 जानेवारी 2017 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेला लेकी वाचवा अभियानाचे पुरस्कर्ते प्रा.वा.ना. आंधळे यांचे आई ! मला जन्म घेवू दे! या कवितेतून समाज प्रबोधन या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
उल्लेखनीय कामगिरीची घेणार दखल
तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांना सावित्रीच्या लेकी हा जीवन गौरव पुरस्कार देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सदर व्याख्यानाचे प्रायोजक स्व. केशरबाई बाबुराव पाटील यांचे स्मरणार्थ विठ्ठल बाबुराव पाटील (नेहेते) यांनी स्विकारले आहे.
याप्रसंगी शकुंतला महाजन, मुख्य मार्गदर्शक कांतीलाल महाजन, मार्गदर्शक रामकृष्ण महाजन, श्रीराम महाजन, एन.आर. महाजन, गणेश फुलमाळी, योगेश मानकर, एस.के. महाजन, डी.बी. महाजन, योगेश महाजन, अतुल महाजन, ईश्वर महाजन, दिनेश महाजन, प्रवीण महाजन, युवक अध्यक्ष प्रकाश महाजन, तालुकाध्यक्ष पिंटू महाजन, सीताबाई महाजन, प्रमिला महाजन, वंदना महाजन, मनीषा महाजन, साविता महाजन, स्वाती महाजन, संदीप महाजन, मुकेश महाजन, संजय महाजन, संदीप महाजन, मयूर महाजन आदींसह खान्देश माळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.