जिल्हाध्यक्षपदी रमेश सोनवणे यांची नियुक्ती
धरणगाव, पारोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगाव समाज बांधवांची मेळाव्यास उपस्थिती
चाळीसगाव – महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा जळगाव जिल्हा कार्यकर्ता संघटन मेळावा नुकताच शामा रेसिडेन्सी ४० गाव येथे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात पार पडला. या मेळाव्याला धरणगाव, पारोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगांव या सर्व भागातून मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. महासंघाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांचा जळगाव जिल्हयातील माळी समाजाकडून मेळाव्यामध्ये भव्यसत्कार करण्यात आला.
खेळी मेळीच्या वातावरण मेळावा संपन्न
अनिल महाजन यांनी मेळाव्या मध्ये बोलताना सांगितले की राज्यसरकार वेळोवेळी माळी समाजावर अन्याय करत आहे. मंत्री मंडळामध्ये माळी समाजाला स्थान नाही.ज्या मतदारसंघात माळी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. अशा मतदारसंघात राजकीय पक्ष माळी समाजातील लोकांना उमेदवारी देत नाहीत.राज्यात लोकसंख्येच्या दुष्टिने २ नंबर ला असणारा हा समाज दिशाहीन झाला आहे.यासाठी सर्व माळी समाजाने एका व्यासपीठावर एकत्र येणे गरजेचे आहे. समाज संघटन हाच विकासाचा पाया आहे.आज आपण एकत्र झालो नाही तर समाजाला अनेक संकटांना तोंड दयावे लागेल, असे यावेळी अनिल महाजन यांनी बोलताना सांगितले. सदर मेळाव्यात खालील कार्यकारणी घोषित करण्यात आली जळगाव जिल्हा अध्यक्षपदी रमेश सोनवणे, चाळीसगाव शहराध्यक्ष जगदीश महाजन, जेष्ठ मार्गदर्शक म्हणुन माजी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ महाजन यांची निवड करण्यात आली.
बैठकीस यांची होती उपस्थिती
यावेळी सचिव आर.बी.माळी, दीपक महाजन, हरिश्चंद्र डोके, प्रवीण महाजन, अशोक भुजबळ, काशिनाथ जाधव, शोभा रासकर, डी.पी. माळी, बी.बी.महाजन, सागर महाजन, प्रवीण महाजन, राजू तावडे, जि.प. माजी सदस्य डॉ.उत्तमराव महाजन, अशोक खलाने, देवराम महाजन, नितीन महाजन, योगेश महाजन, सरिता नेरकर, नाना महाराज, राजाराम माळी, विजय माळी , विनोद माळी, संतोष महाजन, शिवा महाजन, निलेश माळी, राहुल महाजन, रघुनाथ महाजन, आबा महाजन, उमेश महाजन, भिमराव खलाने, जगन्नाथ महाजन, जगदीश महाजन, पी.ओ. महाजन, गणेश माळी, सुनील महाजन, नितीन महाजन, मनोज महाजन, आबा महाजन, कांतीलाल महाजन, शरद महाजन, चंदू महाजन, हिम्मत महाराज, सुनील आप्पा, डॉ. प्रसन्न अहिरे, सुरेंद्र महाजन, भास्कर महाजन, आधार महाजन, मुकुंदा महाजन, खुशाल अहिरे, मनोज महाजन, वसंत महाजन, पप्पू महाजन, कैलास माळी, गोपाल महाजन, कारभारी महाजन, जिभौ महाजन, खुशाल रोकडे आदी उपस्थित होते.