पिंपळनेर। अखिल भारतीय माळी समाज महासंघ व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात 150 मुला- मुलींचा महासंघाचे डी.के.माळी यांच्या अध्यक्षतेखाली तर वालसावंगी जि.प.सदस्या श्रीमती अरूणा वाघ यांच्याहस्ते येथील स्वामी विवेकानंद वाचनालयात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माळी महासंघाचे राजाभाऊ काठे नाशिक, राष्ट्रीय अध्यक्ष संभाजीराव पगारे, कर्मचारी महासंघ प्रदेशाध्यक्ष विलास पाटील, महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष वासुदेव देवरे शिरपूर, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रतिभा माळी, विश्वस्त तारकाताई विवरेकर, आर.ओ.मगरे, नाशिक जिल्हा जिल्हाध्यक्ष नितीन शेलार, नाशिक कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, नाशिक शहराध्यक्ष अंबादास शेळके, अतुल सूर्यवंशी, जयंत बागुल नाशिक, भरत रोकडे, राष्ट्रीय सरचिटणीस विजयराव सोनवणे, संचालक स्वप्नील पगारे, अण्णा हरि नेरकर, व्ही.एन. जिरेपाटील, पुष्पालता पगारे, शोभाताई नहिरे, प्रा.सविता पगारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते 150 गुणवंतांचा सत्कार
प्रास्ताविक भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष संभाजीराव पगारे यांनी विद्यार्थ्यांनी खूप मेहनतीने यश मिळवावं तरच पुढच्या स्पर्धेत यशस्वी होता येते. समाजात अगदी विदारक परिस्थिती असून आपल्या आवडीचं क्षेत्र निवडून पुढील वाटचाल करावी. असे सांगून गुणवंताना विश्वास व उत्तेजन देण्यासाठी अशा सोवळ्याची गरज असते असे शेवटी सांगितले. प्रारंभी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून स्वागतगीताने कार्यक्रमास सुरूवात झाली. यावेळी लोकमान्य टिळक व संत सावता महाराज यांच्या जिवंत आरास.सादर करण्यात आले. कार्यक्रमात विविध क्षेत्रात नैपुण्य मिळालेल्या तसेच विविध महत्वाच्या पदावर निवड झालेल्या व्यक्तींचा ही गौरव करण्यात आला. दहावी व बारावी परीक्षेत 80 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या समाजातील 150 मुले मुलींचा गौरव करण्यात आला.
यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
यावेळी सुभाष जगताप, भिलाजी जिरे, भगवान जगदाळे, दिलीप घरटे, आर.जे.पाटील, दिपक घरटे, भटूभाऊ निकुंभ, कार्यक्रमाचे आयोजन अ.भा.माळी महासंघ साक्री तालुका व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय पिंपळनेर यांच्या सयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सूत्रसंचालन उमेश माळी यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष राजेन्द्र गवळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महासंघाचे पदाधिकारी, वाचनालयाचे संचालक मंडळ, कर्मचारी, ग्रंथपाल चेतन पगारे, धनंजय घरटे, मुख्याध्यापक मोरे, मनेष माळी, सामोडे व पिंपळनेर आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.