मावळमध्ये सेनेची हॅट्रीक होईल-प्रा.नितीन बानगुडे

0

खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत मेळावा

पिंपरी-खासदार श्रीरंग बारणे यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपत दिल्लीमध्ये मराठी आवाज बुलंद केला. देशाच्या संसदेमध्ये सर्वात जास्त प्रश्‍न विचारणारा खासदार, सर्वात जास्त उपस्थित राहणार खासदार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. मावळ मतदारसंघातील प्रश्‍न दिल्लीत मांडून ते सोडविण्याची क्षमता फक्त बारणे यांच्यामध्येच आहे. त्यामुळे मावळात शिवसेनेच्या विजयाची हॅटट्रीक होईल, असा विश्‍वास शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला. थेरगाव येथे प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. या निर्धार मेळाव्यात उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बानगुडे पाटील बोलत होते.

यांची होती उपस्थिती
मेळाव्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी-चिंचवड शहर सल्लागार मधुकर बाबर, जिल्हाप्रमुख मावळ गजानन चिंचवडे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, अनंत को- हाळे, जिल्हा संघटिका शादान चौधरी, विमल जगताप, महिला आघाडी संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी, बाळाभाई कदम, चिंचवड संपर्क प्रमुख अ‍ॅड. वैभव थोरात, राजू खांडभोर, पिंपरी-चिंचवड महापालिका गटनेते राहुल कलाटे, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख योगेश बाबर, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, महिला संघटिका अनिता तुतारे, सरिता साने, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन भोसेकर, अश्‍विनी वाघमारे, रेखा दर्शिले, मीनल यादव, जितेंद्र ननावरे, विमल जगताप, किरण मोटे, संजय काटे, अमोल निकम, तुषार नवले, नवनाथ तरस, सोमनाथ गुजर, बाळासाहेब वाल्हेकर, बाबासाहेब भोंडवे आदी उपस्थित होते.

कामाप्रमाणे प्रचार व्हावा
आपल्या मतदारसंघातील प्रश्‍न देशाच्या राजधानीत मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी श्रीरंग बारणे यांनी अविरत प्रयत्न केले आहेत. देशाच्या विकासासाठी स्थिर सरकार असणे आवश्यक आहे. शिवसेना आणि भाजपच्या महायुतीमुळे हे स्थायी सरकार तयार होणार आहे. श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. ही कामे आता सर्व पदाधिकारी आ णि कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. काहीजण काम मुंगीएवढं करतात आणि त्याचा प्रचार हत्ती एवढा करतात. पण, बारणे यांचे काम हत्तीएवढं आहे. त्यामुळे त्याचा प्रचार देखील हत्तीएवढाच व्हायला हवा. मावळ लोकसभेसाठी खासदार म्हणून श्रीरंग बारणेच कायम सार्थ ठरतील, असेही बानगुडे पाटील म्हणाले.

अनेक कामे केलीत
खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे उमेदवार नाहीत, तर ते महायुतीचे उमेदवार आहेत. असा निर्धार पनवेल येथील मेळाव्यात झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्‍वास, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची साथ यामुळे राजकीय क्षेत्रात नवी उंची मिळाली आहे. आजवर नागरिकांनी दाखवलेला विश्‍वास प्रत्येक क्षणी लोकसभेत सार्थ केला आहे असे श्रीरंग बारणे यांनी सांगितले. दिल्लीमध्ये मराठीला आवाज नाही, हा पायंडा मोडून काढून सर्वात जास्त प्रश्‍न विचारण्याचा विक्रम केला. स्वातंत्र्यानंतर सहा दशकांमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील काही दुर्गम आदिवासी पाड्यांकडे क धीच कुणाचं लक्ष गेलं नाही, तिथं पोहोचून तिथल्या लोकांना रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सोयी पुरविल्या आहेत. जिथं शासकीय योजना पोहोचत नाही, तिथं शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.