माशांच्या हल्ल्याने क्रिकेटपटूंचे ‘सळो की पळो’!

0

जोहान्सबर्ग । जोहान्सबर्गमध्ये श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा वन डे सामना खेळवला जात होता. त्याचवेळी माशांचे वावटळ मैदानावर घोंघावत आले. त्यामुळे काही काळ सामना थांबवावा लागला.असे झाले असले तरी हा सामना दक्षिण आफ्रिकेने सात गडी राखून जिकला. मॅच हरत आली तर, ‘ब्लेम गेम’साठी ‘बकरा’ शोधला जातो. यावेळी मात्र ‘माशां’ना ‘मॅच का मुजरिम’ ठरवायला श्रीलंका मोकळी झाली आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या वनडे सामन्यात माशांनी खोडा घातलो.

श्रीलंका 4 बाद 117 धावांवर खेळत होती.त्यावेळी माशांनी दोनवेळा मैदानावर हल्लाबोल चढवला.माशांचा हल्ल्यामुळे दोन्ही संघाच्या क्रिकेटपटूंसह अम्पायरनेही मैदानावर लोटांगण घातले. अखेर 27 व्या ओव्हरनंतर सामना अधिकृतरित्या थांबवण्यात आला. ‘बीकीपर’ अर्थात माशांना पळवून लावणार्‍या कामगारांना पाचारण करण्यात आलं त्यापूर्वी अग्निप्रतिबंधक उपकरणाचा वापर करण्यात आला. तासाभरानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला.