मुंबई : मालाड मधील भाटी कोळीवाड्यातील मासेमारी नौकेत शनिवारी 26 जानेवारीला गँस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. या आगीतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारार्थ आज एकाचा मृत्यू झाला झाला असून सुरेश कुमार निषाद असे तरुणाचे नाव आहे. सुरेश आगीत भाजला होता. त्याचे आज सकाळी शताब्दी रुग्णालयात निधन झाले आहे.
सुनंदा प्रभाकर कोळी यांच्या मालकीची जय गंगा मैया नौका नोंदणी क्र. एम एच-02-एम एम 5909 ही मासेमारी नौका खोल समुद्रात डोळ मासेमारीसाठी 13 जानेवारी रोजी गेली होती. शनिवार सायंकाळी जय गंगा मैया नौकेवरील खलाशी सुरेश कुमार निषाद जेवण बनवित असताना नौकेतील गँस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन नौकेला आग लागली. या आगीत सात जाळ्यांसह नौका जळून राख होऊन बुडाली आहे. बाजूला असलेल्या नौकांनी खलाशांना वाचविले. त्यांना किना-यावर आणण्यात यश आले. तीन खलाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.