हडपसर । पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ, युवा समिती यांच्या वतीने गरजू विद्यार्थांना शालेय मदत करण्यात आली. यावर्षी पुरंदर तालुक्यातील केतकावळेच्या श्री आदर्श माध्यमिक विद्यालयाची निवड करण्यात आली होती. पुणे-सातारा रोडपासून 3 किमी अंतरावरील या शाळेतील विद्यार्थांना दप्तर, वह्या, पेन्सिल बॉक्स, कलर बॉक्स, वॉटर बॉटल या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते स्वत: आर्थिक मदत देऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात. यावेळी राहुल भुतडा, संतोष जाजू, आनंद कासट, दीपक कासट, मुरली डागा, अभय जाजू, सागर लोया, राकेश लद्दड, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.