मित्रासोबत नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू

0

भुसावळ। नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाचा नदीत बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवार 3 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली़ दुपारपासूनच मृतदेहाचा नदीपात्रात शोध घेण्यात येत होता. रात्री 12 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला.

शहरातील ईदगाह रोड परिसरातील रहिवासी नईम रज्जाक शाह (वय 33) हे आपल्या मित्रासह तापी नदीवर पोहण्यासाठी गेले होत़े दोन्ही जण तापी पात्रात उतरले मात्र नईम हे काही अंतरावर पुढे अंघोळ करीत असताना अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या मित्राने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून आले नाही तर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर ते पाण्यात बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यानंतर रात्री शोध सुरु करण्यात आला़ रात्री 12 वाजेच्या सुमारास मृतदेह सापडला़ शहर पोलिसात अक्रम रहिम पिंजारी (वय 24, लाल बिल्डांगजवळ, भुसावळ) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़.