मित्र पक्ष जदयूकडून भाजपला झटका; तीन तलाक विरोधात मतदान करण्याचा निर्णय

0

नवी दिल्ली-बिहारमधील सत्ताधारी जनता दल यूनाइटेड पक्ष भाजपचा मित्र पक्ष बनला आहे. दोन्ही पक्षात जागावाटपाबाबत एकमत झाले असून जागावाटप देखील झाले आहे. दरम्यान जदयूने भाजपला झटका दिला आहे. सरकारने लोकसभेत मंजूर केलेल्या तीन तलाक विधेयकाला राज्यसभेत मतदान न करण्याचा निर्णय जदयूने घेतला आहे.

सरकारने तीन तलाक विधेयक आणण्यामध्ये घाई केली असेही जदयूने सांगितले आहे. मात्र भाजपकडून अद्याप याबाबत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सरकारने मुस्लिम महिलांच्या संरक्षणासाठी तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे. हे विधेयक आता मंजुरीसाठी राज्यसभेत ठेवण्यात आलेले आहे. राज्यसभेत भाजपचे बहुमत नसल्याने आव्हान उभे राहिले आहे.