जळगाव । संस्थेच्या संचालक मंडळाची सभा बुधवार दि. 12/7/2017 रोजी संस्थेच्या कार्यालयात झाली. त्यात संस्थेच्या पो.नि.नं. फ 1.1/8 नुसार ज.जि.म.स. बँकेच्या प्रशासन व व्यवस्थापन विभागाचे व्यवस्थापक प्रल्हाद भाऊलाल सपकाळे यांना पदसिध्द चेअरमन म्हणून स्वीकृत करण्यात आले. मावळते पदसिध्द चेअरमन प्रकाश भटा पाटील यांनी नवीन चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यांनी केले अभिनंदन..
जिल्हा बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष हेमंतकुमार साळुंखे व जनरल सेक्रेटरी सुनिल पवार, जगदिश भगवंतराव चव्हाण व संचालक सदस्य सुनील चौधरी, संदीप पाटील, मुकेश सुर्वे, भालचंद्र पाटील, विश्वास पाटील, महेेंद्र घोरपडे, गणेश पाटील, किशोर भंगाळे, कडु पाटील, युवराज तायडे, नयना पाटील, हिराबाई पाटील, सेक्रेटरी नारायण पवार यांनी स्वागत केले.