मिनिटभर वेळ आहे ना, मग तुमची हाडे नक्कीच मजबूत होणार

0

लिसेस्टर : महिलांनी एक मिनिट जरी व्यायाम केला जसे की धावणे, वजन उचलणे तरी त्यांची हाडे चार टक्क्यांनी जास्त मजबूत होताता. मला कामातून वेळ नसतो असे बोलून स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करणाऱ्या महिलांना नक्कीच स्वहितासाठी जागे करणारे एक संशोधन समोर आले आहे.

एक्झेटर आणि लिसेस्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अडीच हजार महिलांची आरोग्यविषयक माहिती गोळा करून तुलना केली. फिटनेससाठी त्या करीत असलेला व्यायाम आणि हाडांचे आरोग्य अशा दोन घटकांचा परस्पर संबंध त्यांनी दाखवून दिला.

ऑस्टीओपोरोसिस (हाडांना सूक्ष्म छीद्रे पडणे) मुळे हाडे ठिसूळ होतात. थोडा धक्का लागला तरी मोडतात. वृद्धत्वाकडे कलल्यावर आणखी समस्या येतात. त्यासाठी हाडे मजबूत ठेवावी लागतात.

शास्त्रज्ञांवर शृंगापत्ती आली की व्यायाम करून हाडे मजबूत होतात की हाडे मजबूत असतात त्या महिला चांगला व्यायाम करतात, व्हीक्टोरिया स्टाईल्स सांगतात. पण महिलांमध्ये की वजन उचलण्याचा व्यायाम करणऱ्या महिलांमध्ये हाडांचे आरोग्य उत्तम असते. ज्या स्त्रिया दोन मिनिटापेक्षा जास्त व्यायाम करतात त्यांची हाडे ६ टक्के जास्त मजबूत होतात आणि एक मिनिटभर व्यायाम करतात त्यांची हाडे ४ टक्के जास्त मजबूत होतात.