जळगाव । अजिंठा चौफुलीजवळील असलेल्या नेरी नाका स्मशानभुमीजवळ एक 407 गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार खाली पडून डोक्यावरून चाक गेल्याने दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 4.30 वाजेच्या सुमारास घडली असून 407 गाडी पोलीसात ताब्यात घेतले असून चालक घटनास्थळाहून फरार झाला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुझाउद्दिन कुतुबोद्दिन काझी (वय-30) रा.पिरजादे वाडा मेहरुण, जळगाव हा मोटारसायकल क्रमांक (एमएच 03 एसी 157)ने घराकडून शहराकडे येत असतांना दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास नेरी नाका स्मशान भूमीजवळ असलेल्या नाल्याच्या पुलाजवळ मागून येणार्या 407 गाडी क्रमांक (एमएच 18 इ 7282) भरधाव येवून मागून जोरादार धक्का दिला. या धक्क्यात मुझाउद्दिन हा तरूणा खाली पडताच डोक्यावरून चाक गेल्याने त्या जागीच मृत्यू झाला. तरूण मयत झाल्याचे पाहून चारचाकी वाहन चालक घटनास्थळाहून फरार झाला. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला आहे.