जामनेर- वाकोद येथून लाकूड घेवून निघालेल्या मिनीट्रकचे टायर फुटल्याने जामनेरच्या जिन प्रेस जवळ अपघात होवून वर बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.असून या घटनेत अजून एक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली. सविस्तर माहिती अशी भुसावळ रोडवर असलेल्या संजय कापडे यांच्या सॉ मिल वरील मिनीट्रक वाकोद येथे लाकूड भरण्यासाठी गेला होता.तेथून लाकूड भरलेला हा ट्रक जामनेरला येत असताना गावाजवळील जिन प्रेस जवळ या ट्रकचे टायर फुटून अपघात झाला.यात संजय कापडे यांचा मुलगा मनिष संजय कापडे (वय-२६) याचा ट्रकमधील लाकडं अगांवर पडल्याने व डोक्याला जोरात मार लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर आणखी एक घटनेत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली. मयत मनिष हा सॉ मिलवरील लाकडाचा माल घेण्यासाठी नेहमी मोटर सायकल वर जात होता.आज मात्र मनिष कामावरील माणसां सोबतच ट्रकमधे गेला.व घराकडे परत येतानां असा अपघात झाला.मयत मनिष हा मनमिळावू स्वभावाचा असल्याने मित्रामधे आवडता होता.