मिनी माथूर चित्रपट समीक्षकांवर नाराज

0

मुंबई : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच केवळ काही तासांतच चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळण्यास सुरुवात झाली. चित्रपटाला पहिल्याच दिवशी समीक्षकांनी दिलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल दिग्दर्शक कबीर खानची पत्नी मिनी माथूरने नाराजी व्यक्त केली आहे.

मिनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत आपल्याला हा चित्रपट आवडला असल्याचे सांगत कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. यासोबतच चित्रपट प्रदर्शित होताच काही तासांतच त्याचे भविष्य कसे ठरवू शकता? असा प्रशन तिने समीक्षकांना केला आहे. प्रेक्षकांना चित्रपट पाहू द्या आणि तो कसा आहे हे त्यांना ठरवू द्या. तुमच्या निगेटीव्ह प्रतिक्रियांमुळे कलाकारांचे २ वर्षांचे कष्ट का वाया घालवता? असा सवालही तिने समीक्षक आणि पत्रकारांना केला आहे.