मिनी हायमॅक्सचे उद्घाटन

0

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून मिनी हायमॅक्स एलएडीचे दिवे सुभाष चौक व दाभाडे आळी येथे बसविण्यात आले. याचे उद्घाटन नगरसेविका मंगल जाधव यांनी कळ दाबून केले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून नगरपरिषद फंडातून या लाईटसाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च आला. हे लाईट बजाज लाईट कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहेत. उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेविका निलीमा दाभाडे, रजनी ठाकूर, साहेबराव दाभाडे, किसनराव दाभाडे, सचिन जाधव, शकुंतला दाभाडे, सुभद्रा दाभाडे, विमल दाभाडे, वैशाली भोते सह या परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येनी उपस्थित होते.