मिलमध्ये आगल्याने ३५ कामगार जखमी

0

सुरत – गुजरातमधील सुरत येथील पांडेसेरा भागातील एका इमारतीला मोठ्या प्रमाणावर आग लागल्याने ३५ कामगार होरपळून जखमी झाले आहेत. त्यांना येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शालू डाईंग मीलमध्ये एका पाईपवर स्लॅब कोसळल्याने ऑईल गळती झाली. यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मीलला आग लागल्याचे समजताच अग्नीशमनच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळावर बचाव पथकाला पाठवले. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.