महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, व्यायामशाळा यांची केली पाहणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतीमध्ये पडून असलेल्या भंगार साहित्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्यांना दिल्या. अनेक मिळकतींमध्ये कपाटे, खुर्च्या, टेबले, न लागणार्या वस्तू आहेत. त्यामुळे या भंगाराची विल्हेवाट लावण्याकडे अधिकारी व कर्मचार्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असेही महापौरांनी सांगितले. महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, व्यायामशाळा, सांस्कृतिक हॉल, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, जलतरण तलाव, कुस्ती केंद्र यांना भेटी देतेवेळी महापौर जाधव यांनी सूचना दिल्या. यावेळी माजी महापौर योगेश बहल, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य संतोष कांबळे, रोहित काटे, नगरसेविका आशा शेंडगे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, सुजाता पालांडे, प्रभाग स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे, कार्यकारी अभियंता मनोज शेठीया, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, सहाय्यक आरोग्याधिकारी सासवडकर, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर उपस्थित होते.
टेनीस कोर्टची पहाणी
हे देखील वाचा
‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेली साई शारदा महिला व्यायमशाळा, पी.डब्ल्यु.डी. मैदान व बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट, सावता माळी उद्यान, सांगवी जलतरण तलाव व शिवसृष्टी, शिवाजी उद्यान, कासारवाडी जलतरण तलाव व उद्यान, दापोडी बुध्दविहार येथे नविन विकसित होत असलेले उद्यान, आई उद्यान दापोडी, फुगेवाडी येथील कुस्ती केंद्र, हनुमान जीम, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम उद्यान, राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, वल्लभनगर येथील व्यायामशाळा व उद्यान, महेशनगर येथील व्यायामशाळा व उद्यान, सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट याची महापौर जाधव यांनी पाहणी केली.
नियमित स्वच्छता राखावी
महापालिकेच्या मिळकतीमध्ये नादुरूस्त, खराब पडून असलेले साहित्य तातडीने उचलून त्या भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे, उद्यानामध्ये ओपन जीम बसविणे व शौचालय, मुतारी बांधणे, क्रीडांगणावर लाईटची व्यवस्था करणे, सिंथॅटिक कोर्ट तयार करणे, स्वच्छता मोहिमे अंतर्गत वॉर्डात स्वच्छता राखणे, दररोज साफसफाई करणे, राडारोडा नियमित उचलणे, उद्यानातील झाडांना मैला शुध्दीकरण केंद्रातील स्वच्छ केलेले पाणी कायमस्वरुपी वापरणेबाबत उपाययोजना करावी, व्यायामशाळेला आवश्यक साहित्य पुरविणे अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.