मिळकत करवाढीचा प्रस्ताव एकमताने फेटाळला

0

पुणे । महापालिकेच्या 2018-19च्या अंदाजपत्रकात 15 टक्के मिळकत करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला आहे. मात्र याचा निर्णय मुख्यसभेत होणे आवश्यक असल्याने सोमवारी खास सभा बोलावण्यात आली होती. या करवाढीला सर्वपक्षाचा विरोध असल्याने प्रस्ताव एकमताने फेटाळण्यात आला.

उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालण्यासाठी 2018-19 या वर्षात मिळकत करात वाढ करणे आवश्यक आहे. मिळकत करात एकूण 15 टक्के वाढ सुचविली होती. त्यात सर्वसाधारण करात चार टक्के, सफाई करात साडेचार टक्के, अग्निशामक करात अर्धा टक्के, जललाभ करात सव्वा टक्के, जलनिस्सारण लाभ करात अडीच टक्के आणि मनपा शिक्षण करात सव्वा दोन टक्कांचा समावेश होता. मिळकतकरातील वाढीने 135 कोटी 22 लाखाने उत्पन्नात वाढ होणार होते मात्र प्रशासनाने उत्त्पन्न वाढीसाठी अन्य उपाययोजना कराव्यात त्यासाठी पुणेकरांवर करवाढ नको अशी भूमिका सर्वपक्षीय सदस्यांनी घेत हा प्रस्ताव एकमताने फेटाळला.