मिळवतीवरील मनाई नोंद रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण

0

यावल– शहरातील रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थींनी ज्या मिळकतीवर लाभ घेत घर बांधले अशा लाभ घेतलेल्या मिळकतीवर खरेदी-विक्रीस घातलेली मनाई नोंद रद्द करावी या मागणसाठी भारिप बहुजन महासंघाचे सीताराम टिकाराम पारधे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पारधे यांच्यासह दत्तात्रय चिधु सावकारे, रमेश शामराव वानखेड़े, नितीन देवराम डांबरे, विजय पंडित सावकारे, चुडामण फकिरा हनवते, शिवाजी मिठाराम सुरवाडे, जगन्नाथ मिठाराम सुरवाडे, अलका पंडित सुरवाडे, वामन पाहणु हिवरे, गौतम अशोक पारधे, सुनिल कडु गजरे, बाळु तुकडू डांबरे, विलास वना भास्कर, सुमनबाई कडु गजरे, अजय वसंत पारधे अशा 16 जणांनी उपोषण सुरु केले आहे. शासनाकडून घर बांधण्यासाठी केवळ दीड लाख रुपये दिले जातात मात्र शहरात दलित बांधवांच्या मालमत्तेची किंमत त्याहून कितीतरी पटीने जास्त आहे. तेव्हा अशा मिळकतीवर कुणी दलित बांधव बँकेतुन कर्ज काढून त्याच्या उदरनिर्वाहकरीता व्यवसाय करू इच्छितो मात्र शासकीय नोंदीमुळे कोंडी होत आहे.