‘मिस्टर आशिया’चा ब्रॉन्झपदक विजेता गौरव मदतीच्या प्रतीक्षेत

0

पुणे । गौरव याने शरीर सौष्ठव (बॉडी बिल्डिंग) या खेळाला 2011मध्ये सुरुवात केली. आज त्याने ज्यु. मिस्टर युनिव्हर्स हा किताब मिळवला आहे. अतिशय खडतर परिस्थितीतून त्याने आपल्या खेळाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. मिस्टर आशिया 2017 या स्पर्धेमध्ये गौरवने ब्रॉन्झपदक पटकविल्यानंतर त्याच्या वडील अशोक शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्याला आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.या खेळाडूचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यतील चिपळूण तालुक्यातील नांदिवस हे आहे. सध्या त्याचे वास्तव्य पिंपरी-चिंचवडमधील चिखली म्हेत्रे वस्ती येथे आहे. त्यासोबत त्याचे आई, वडील व बहीण राहतात. त्याचे वडील खडकी येथील 512 आर्मी बेस वर्कशॉपमध्ये काम करतात. गौरव याने शरीर सौष्ठव (बॉडी बिल्डिंग) या खेळाला 2011मध्ये सुरुवात केली. सुरुवातीपासून त्याने खूप मेहनत केली. गौरवला रूपेश पिल्ले व जय दाभाडे यांनी मार्गदर्शन केले.

3 ते 3.5 लाखांचा खर्च झाला होता
गौरव याच्या मागे त्या भागातील नगरसेवक सुरेश (तात्या) म्हेत्रे हे नेहमीच उभे राहिले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड महापालिकेतून त्याला स्थायी समितीकडून व्यायामशाळा मंजूर करून दिली. तसेच सुरेश म्हेत्रे व नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी आर्थिक मदत केली. मिस्टर आशिया 2017 या स्पर्धेमध्ये गौरव अशोक शिंदे याने ब्रॉन्झपदक पटकविल्यानंतर त्याच्या वडिलांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेने गौरवला आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. कारण यासाठी जवळजवळ 6 महिने तयारी करावी लागते. या तयारीसाठीचा व स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत पोहचण्याचा प्रवासस्वर्च मिळून 3 ते 3.5 लाखांचा झालेला आहे. बँकेतून कजर्र् काढून मुलाला या स्पर्धेला पाठविले होते. माझ्या मुलाने मिस्टर आशिया 2017 या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झपदक जिंकून संपूर्ण आशिया खंडामध्ये पिंपरी-चिंचवडचे, महाराष्ट्राचे व देशाचे नाव मोठे केले असून यासाठी त्याला पालिकेने मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.

गौरव याने आजपर्यंत मिळविलेले पुरस्कार
मि. आशिया 2017 ब्रॉन्झ पदक
ज्यु. मि. युनिव्हर्स 2017 इटली
सिनेयर मि. इंडिया किताब, केरळ :ब्रॉन्झ पदक
ज्यु. मि. इंडिया. गोवा:सिल्व्हर
सिनियर महाराष्ट्र गोल्डमडेल (दोन वेळा)
ज्यु. महाराष्ट्र गोल्ड मेडल
पुणे गोल्ड मेडल (3 वेळा)
अशाच पद्धतीने स्थानिक, जिल्हा स्पर्धेमध्ये त्याला बक्षिसे मिळाली आहेत.