कोलंबो । मला मागील तीन फिटनेस चाचण्यांमध्ये अपयश आले. मात्र, मी फिटनेस चाचणी उत्तीर्ण झालो आहे. मी आत्मविश्वास गमावलेला नाही. किमान 2019 पर्यंत तरी खेळणे सुरूच ठेवेन, असे भारतीय संघाचा धाकड अष्टपैलू युवराज सिंग याने सांगितले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू युवराजसिंग याला आपले अपयश मान्य असले, तरी 2019 पर्यंत संघात परतण्यासाठी हार न मानता प्रयत्न करणार असल्याचा निर्धार युवराजने व्यक्त केला आहे. फिटनेस चाचणीत तो अपयशी ठरत असल्याने त्याला संघाबाहेर राहावे लागत आहे.
काल घोषित झालेल्या आफ्रिका दौर्यासाठीदेखील युवराज सिंगची निवड होऊ शकलेली नाही. कधीकाळी संघाचा तारणहार असलेला युवी बर्याच काळापासून संघाबाहेर असून संघात येण्यासाठी धडपड करत आहे.