मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं – सोनू निगम

0

मुंबई : प्रेक्षकांना आपल्या आवाजानं मोहित करणार गायक सोनू निगमवर आता स्वत:ला पाकिस्तानी गायक म्हणवून घेण्याची वेळ आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान सोनूनं भारतीय गायकांसोबत केला जाणाऱ्या दुजाभावाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘आजच्या काळात गायकांना गाण्यासाठी म्यूझिक कंपनीला पैसे द्यावे लागतात. शोसाठी म्यूझिक कंपनी भारतीय गायकांकडून पैसे मागतात. पैसे दिले की तुम्हाला प्रसिद्धी देतात. मात्र पैसे देण्याचं नाकारलं की मात्र तुम्हाला ते गाऊ देत नाही ना काम देत. हा दुजाभाव केवळ भारतीय कलाकारांसोबत का? त्यापेक्षा पाकिस्तानी गायक असलेलं काय वाईट आहे?’ असं म्हणत सोनूनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.