पुणे पालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे विजयी

0

पुणे :- येथील महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत मुंढवा मगरपट्टा सिटी प्रभाग- 22 मध्ये राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करीत विजय मिळविला. माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी काल (6 एप्रिल) मतदान घेण्यात आले होते. विजयी उमेदवार पूजा समीर कोद्रे या चंचला कोद्रे यांच्या जाऊबाई आहेत.

मुंढवा पालिकेच्या पोटनिवडणुकीतमध्ये पूजा कोद्रे यांना 8991 मते मिळाली होती, तर शिवसेनेच्या उमेदवार मोनिका तुपे यांना 5470 मते मिळाली. तसेच भाजपच्या उमेदवार सुकन्या गायकवाड यांना 4334 मते मिळाली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या धोरणानुसार ही पोटनिवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले होते.