पुणे । पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे एक कर्त्यव्य निष्ठ अधिकारी म्हणून सर्वश्रुत आहेत. तोट्यात असणार्या पीएमपीएला फायद्यात आण्यासाठी ते विविध गोष्टीत कपात करून आणि वेळप्रसंगी भाडे वाढ करून उत्पनात वाढ करण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे ते ज्या घरात राहतात त्या घराचे भाडे मात्र तब्बल 95 हजार असून ते पीएमपीएल अदा करत असल्याचे वास्तव एका वृत्तवाहिनीने समोर आणले आहे. त्यामुळे मुंढेचा दुट्टपीपण समोर येऊन ते पुन्हा एकदा नव्या वादात आले आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात प्रवासी वाहतूक करणार्या पीएमपीएलचे सन 2016-17 चे एकूण उत्पन्न 576 कोटी 78 लाख रुपये आहे. त्या वर्षाचा एकूण खर्च 920 कोटी 54 लाख आहे. एकूण तोटा 343 कोटी 76 लाख आहे. इतका मोठा तोटा पीएमपीएल सहन करा आहे. म्हणून मुढें यांनी पासचे दर वाढवले, कामगारांना बोनस नाकारला. मात्र, स्वतःच्या राहण्यासाठी आलिशान घराचा लोभ मात्र ते सोडू शकले नाहीत. पीएमपीएल ही महापालिकेची कंपनी आहे. महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात फ्लॅट पडून आहेत. त्यामुळे मुंढेंनी मागितले असते तर पालिकेने शहरातील चांगल्या ठिकाणी त्यांना घर उपलब्ध करून दिले असते मात्र मुंडेंनी तशी मागणीची केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही मुंढेंची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप नागरिक आणि कामगारांनी केला आहे.