मुंबईकरांची टोइंगमधून होणारी लूट थांबवा

0

मुंबई । मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना पत्र लिहून विनंती केली आहे की त्यांनी विशेष लक्ष घालून पुढाकार घेऊन मुंबई ट्रॅफिक पोलीस आणि विदर्भ इन्फोटेक यांचा करार ताबडतोब रद्द करावा. विदर्भ इन्फोटेकचा करार रद्द करून मुंबईकरांची टोइंगमधून होणारी लूट थांबवावी. विदर्भ इन्फोटेक कंपनीला कोणताही अनुभव नसताना हे काम देण्यात आलेले आहे. टेंडरमधील सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून नागपूरची ही कंपनी विदर्भ इन्फोटेक यांना काम देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र सरकारने टोइंगच्या कामासंदर्भात 8 एप्रिल रोजी टेंडर काढले, त्यामध्ये प्रमुख अट आहे की कंपनीला टोइंग व्यवसायाचा किमान 5 वर्षे अनुभव असले पाहिजे.

विदर्भ इन्फोटेक कंपनीचा करार रद्द
विदर्भ इन्फोटेक कंपनीला या व्यवसायाचा कोणताहीअनुभव नसताना 27 मे रोजी हे काम दिले गेले. विदर्भ इन्फोटेकला हे काम मिळाल्यानंतर या कंपनीने 22 जुलै रोजी म्हणजेच दोन महिन्यानंतर खास एजीएम घेऊन नंतर आम्ही टोइंग व्यवसाय सुरू करत असल्याचे नमूद केलेले आहे. म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की विदर्भ इन्फोटेक कंपनीचा करार रद्द करावा, असे संजय निरूपम यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुंबईकरांची लूट
भाजप सरकारने विदर्भ इन्फोटेक कंपनीला काम दिल्यामुळे यापूर्वी टोइंगचा व्यवसाय करणारे छोट्या छोट्या एजेन्सी बंद झाल्या. अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत. यापूर्वी मुंबईवाहतूक पोलीस 100 ते 150 रुपये दंड आकारायचे. परंतु आत्ता हेच दर 430 % ने वाढवले आहेत. याकंपनीला हे काम 7 वषार्ंसाठी देण्यात आलेले आहे तसेच दरवर्षी 10% ने दंडाची रक्कम वाढणार आहे. ही मुंबईकरांची मोठी लूट आहे. ही त्वरित थांबवावी. तसेच याचकंपनीला वरळी येथील मुंबई ट्रॅफिक पोलीसच्या मुख्यकार्यालयात 1000 ीिं षीं जागा मोफत स्वरूपात देण्यात आलेली आहे. ही जागादेखील त्यांच्याकडून काढून घ्यावी, असे संजय निरूपम म्हणाले.