मुंबई-बेस्ट कर्मचाऱ्यांनी नऊ दिवसानंतर संप मागे घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेस्टची बस रस्त्यावर धावू लागली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे आतोनात हाल झाले. मात्र आज संप मागे घेतल्याची घोषणा झाली आणि मुंबईकरांना दिलासा मिळाला. संप मिटल्याची घोषणा होताच बससेवा पूर्ववत झाली आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी नऊ दिवसांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. संप मिटल्याची अधिकृत घोषणा सर्व कर्मचाऱ्यांसह बेस्ट कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली आहे. वेतनवाढीबाबत उच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अंतिम तडजोडीसाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. जानेवारी 2019 पासून कामगारांना 10 टप्प्यातील वेतनवाढ लागू करण्याचेही प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.