मुंबईच्या लोकलसाठी 51 हजार कोटी

0

मुंबई । देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांवरही विशेष लक्ष दिले जाईल. 3600 किलोमीटर रुळांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. 40 हजार कोटी रुपये एलिव्हेटेड कॉरिडोरच्या उभारणीसाठी खर्च केले जाणार आहेत. मुंबई रेल्वेचे विस्तारीकरण करण्यात येणार असून 90 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या मार्गाचे काम सुरू करण्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत, त्या पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. रेल्वेसाठी 1 लाख 48 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. संपूर्ण रेल्वे ब्रॉडगेज करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे सुरक्षेला सरकारचे प्रथम प्राधान्य असल्याचेही ते म्हणाले. रेल्वेची सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून तरतुदीतील बहुतांश निधी रेल्वेरुळ आणि मार्ग बदलण्यासाठी वापरण्यात येणार आहे. पाच हजार किलोमीटरचे मार्ग बदलण्याचे काम सुरू आहे, अशी माहितीही जेटली यांनी दिली. यावर्षी 700 नवीन इंजिने आणि 5160 नवीन डबे तयार करण्यात येणार आहेत. सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यावर्षी 600 रेल्वे स्थानके अत्याधुनिक करण्यात येणार असून, स्थानके अद्ययावत आणि सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.

ट्रॅकच्या विस्तारासाठी 11 हजार कोटी
अर्थसंकल्पात रेल्वेला मिळालेल्या एकूण 1 लाख 48 हजार कोटी रुपयांपैकी एकट्या मुंबईच्या ’लाईफलाईन’साठी 51 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्यात मुंबई रेल्वेच्या विकासासाठी 40 हजार कोटी रुपयांच्या तरतूदीसोबत रेल्वे ट्रॅकच्या विस्तारीकरणासाठी 11 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त तरतूदीचा समावेश आहे.

रेल्वेची ही कामे मार्गी लागणार
मुंबईला मिळालेल्या निधीतून 11 हजार कोटी खर्च करुन 90 किमीच्या रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. तर 160 रेल्वे ट्रॅकचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, सीसीटिव्ही कॅमेरा, वायफाय सुविधा देण्यात येणार आहे.