मुंबई : ‘झिरो’ चित्रपटासाठी दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी मुंबईतच मेरठ उभं केलं आहे. या सेटच्या स्थापनेसाठी त्यांनी ३०० स्थानिक लोकांना बोलावले होते. हा सेट मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये उभा केला आहे. ज्यात मेरठमधील प्रतिष्ठित घंटाघर आणि मेरठच्या रस्त्यांचे रिक्रिएट केले. तसेच मेरठच्या स्थानिक कलाकारांना ही मदतीसाठी बोलवले होते.
‘झिरो’ चित्रपटात बादशाह शारुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या २१ डिसेंबरला रिलीझ होणार आहे.