भुसावळ- मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याने भुसावळा या गाड्या आल्यानंतर रेल्वे प्रवाशांनी बुधवारी सायंकाळी चांगलाच संताप व्यक्त केला. पावसामुळे अनेक गाड्या भुसावळ मार्गाने वळवण्यात आल्या तर अचानक आलेल्या या गाड्यांना सिग्नल न मिळाल्याने भुसावळ स्थानकावर गोंधळ प्रवाशांनी चांगलाच गोंधळ घातला. या प्रकारानंतर रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रवाशांची समजूत काढली. रेल्वे गाड्यांचे मार्ग बदल झाल्यामुळे एक-एक तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी गाड्या भुसावळ स्थानकावर थांबवण्यात आल्या.