मुंबईत मलेरियाचे 271 रुग्ण

0

मुंबई । ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा मुंबईकरांना सप्टेंबर महिन्यात सोसावा लागतो आहे. त्यामुळे ‘घामाघूम’ झालेल्या मुंबईकरांना आजारांना सामोरे जावे लागते आहे. पावसाने दडी मारूनही मुंबईवरील डेंग्यू, मलेरियाचे सावट कायम असल्याने काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1 ते 11 यादरम्यान पालिकेच्या रुग्णालयात मलेरियाचे 271 रुग्ण आढळले आहेत. तर त्याखालोखाल गॅस्ट्रोचे 200 आणि डेंग्यूचे 102 रुग्ण
आढळले आहेत.

स्वाइनचे 20 रुग्ण
स्वाइनचे 20 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिवसागणिक मुंबई शहर-उपनगरांत साथीच्या आजारांचा आलेख चढताच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वेळोवेळी प्रशासनातर्फे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होत असल्याने मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते आहे. त्याचप्रमाणे, शहर-उपनगरातील वातावरणात आर्द्रतेची वाढ झाल्याने श्वसनाचे विकारही उद्भवत आहेत. धुके आणि धुळीकणांमुळे त्वचासंसर्गही वाढत आहे. वातावरणात खूपच तफावत असल्याने साथीचे आजार वाढत आहेत.