मुंबईत विशेष पॉवर ब्लॉक : दहा रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ :  रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे-दिवा पाचव्या व सहाव्या लाईन कार्यान्वित करण्यासाठी विशेष अधिक पॉवर ब्लॉक घेण्याचे नियोजन केले आहे. दिवा (उत्तर) येथे क्रॉसओवर डाऊन थ्रू डाउन आणि अप लोकल मार्गावरून सुरू करण्याचे नियोजन असून ठाणे व दिवा विभागादरम्यान मेन लाईनवरील या कामामुळे भुसावळ विभागातून धावणार्‍या दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द झालेल्या गाड्या व कंसात रद्द तारीख
गाडी क्रमांक 12110 मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस (8 व 9 जानेवारी), गाडी क्रमांक 12071 मुंबई-जालना एक्सप्रेस (8 व 9 जानेवारी), गाडी क्रमांक 12072 जालना-मुंबई एक्सप्रेस (8 व 9 जानेवारी), गाडी क्रमांक 12109 मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस (8 व 9 जानेवारी), गाडी क्रमांक 12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस (8 व 9 जानेवारी), गाडी क्रमांक 12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस (7 व 9 जानेवारी), गाडी क्रमांक 17611 नांदेड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस (7 व 8 जानेवारी), गाडी क्रमांक 17612 मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस (8 व 9 जानेवारी), गाडी क्रमांक 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस (7 व 8 जानेवारी), गाडी क्रमांक 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस (8 व 9 जानेवारी) रद्द करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे तर ऐनवेळी रद्द झालेल्या या गाड्यांमुळे प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सोसावा लागणार आहे.