मुंबईत 22 हजार फेरीवाला क्षेत्र निश्‍चित; हरकती मागविल्या

0

मुंबई । मुंबईतील फेरीवाल्यांकरिता पालिकेने 22 हजार क्षेत्रांना मान्यता दिली असून या क्षेत्राबाबत जनतेकडून ऑनलाईन पध्दतीने हरकती सुचना मागविण्यात येणार आहेत. त्याकरिता 19 डिसेंबर अंतिम तारीख दिली आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते आहे. मुंबईत रस्ते, चौक, रेल्वे पूल ते गल्लीबोल फेरीवाल्याने वेढले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून चालताना मुंबईकरांना कसरत करावी लागते.

फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्र तयार करण्याचे न्यायालयाचे आदेश दिले होते. त्यानुसार फेरीवाल्यांची पात्रता- अपात्रता निश्‍चित करण्यासाठी मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. राज्य शासनाने आता फेरीवाला क्षेत्रांबाबतची योजना प्रसिद्ध केली आहे. यामुळे पालिकेने जुन्याच अर्जांचे संकलन करणे, छाननी करणे व या योजनेतील निकषांच्या आधारावर पदपथ विक्रेत्यांची नोंदणी करुन त्यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.